नांदुरा 🙁 तालुका प्रतिनिधी )
नांदुरा तालुक्यातील वीज समस्या दूर करण्यासाठी नवीन रोहीत्र मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी आ. चैनसुख संचेती यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गत् काही काळापासून वाढत्या वीज भारामुळे लो-व्होल्टेज व वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त होते. या समस्येवर तातडीचा तोडगा काढण्यासाठी आमदार चैनसुख संचेती यांनी महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर विशेष योजनेंतर्गत मलकापूर विभागासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत. ऊर्जा विभागाच्या धोरणानुसार, ज्या भागात ६३ केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाले आहेत आणि ओव्हरलोड झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत आहेत, अश्या सर्व ठिकाणी १०० केव्हीएचे नवीन ट्रान्सफॉर्मर्स अवघ्या ३ दिवसात बसविण्यात येणार असून आमदार संचेती यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या आता दूर होणार आहेत .
Users Today : 64