बंजारा समाजातील माता-भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करून त्यांना फगवा देताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड….!

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )

होळी सणाच्या निमित्ताने मतदारसंघातील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय बुलढाणा येथे बुलडाणा तसेच मोताळा विधानसभा मतदार संघातील डोंगर खंडाळा तसेच ईतर गावातील बंजारा समाजातील माता-भगिनींच्यावतीने आयोजित उत्सवात सहभागी होऊन बंजारा बांधवांना होळी सणाच्या शुभेच्छा देताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड….! यावेळी त्याठिकाणी बंजारा बांधवांनी माता-भगिनींनी पारंपारिक वादन व नृत्य सादर करून धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे स्वागत केले, बंजारा बांधवांसोबत धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे अतिशय जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, बंजारा बांधवानी नेहमीच भाऊंवर प्रेम केले आहे, त्यांच्या सोबत होळीचा उत्सव दरवर्षी साजरा करताना होत असलेला आनंद हा शब्दात व्यक्त न करता येणारा आहे असे यावेळी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी सांगितले…! होळी हा बंजारा समाज बांधवांच्या जीवनातला सर्वांत महत्त्वाचा सण. तसेच मुक्त आणि प्रसन्न वातावरणात होळी साजरी करण्यात येते. मानवी संस्कृतीची मूल्ये जपणारी ही होळी म्हणूनच या बंजारा समाज बांधवांच्या जीवनात महत्त्वाची आहे. यावेळी त्या ठिकाणी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 5 1 1 6
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *