डोणगाव 🙁 तालुका प्रतिनिधी )
लोकार्पण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून लोणी गवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज करण्याकरिता प्रयत्न सुरू • होते. त्यातच १३ मार्च रोजी डीएचओ पाहणी करण्यासाठी येणार असल्याने साफसफाडू सुरू होती. इमारतीवर बसलेले आगी मोहोळ उठविण्याच्या प्रयत्नात मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात आरोग्यसेवकासह अन्य एकजण जखमी झाला. गंभीर जखमी कर्मचाऱ्यावर औषधोपचार सुरू आहेत. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मेहकर तालुक्यातील ग्राम लोणी गवळी येथे २०१२ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाली होती. मात्र, गावाचे नाव चुकून ‘वनी रुकडी’ असे झाल्याने हा प्रस्ताव रेंगाळला. गावाच्या नावातील बदल करण्यासाठी पाच वर्षे लागली. त्यानंतर २०१७ मान्यता मिळाली आणि काम सुरू झाले. गेल्या आठ वर्षांपासून इमारत बांधकाम सुरू होते. येथे कोणीच राहात नसल्याने आगी मोहोळाच्या मधमाशांनी पोळे तयार करून तेथेच बस्तान मांडले. दरम्यान, आता आरोग्य केंद्राचे लोकार्पण करावयाचे असल्याने आरोग्य विभागाने तयारी चालविली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता पाहणी करण्यासाठी जाणार होते. त्यामुळे सकाळीच साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली. बसलेले मोहोळ उठविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. धूळ साफ करण्यासाठी बोअरवेल चालू केला. पाणी मारत असतानाच मधमाशा चवताळून उठल्या. मधमाशांनी चावे घेतल्याने आरोग्यसेवक किशोर धोटे गंभीर जखमी झाले. त्यांना दीडशेवर मधमाशांनी दंश केला. तसेच मुकादमही जखमी झाला. डोणगाव येथील प्राथमिक केंद्रात जखमींवर डॉ. राम गायकवाड यांनी उपचार सुरू केले. दरम्यान, डीएचओ यांनी दवाखान्याला भेट दिली. तसेच जखमी कर्मचाऱ्याची विचारपूस केली.
Users Today : 64