गलेलठ्ठ पगार लाटणारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आताशा मुजोर झालेत.. भादोला येथील झेडपी शाळेतील 8 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुठले धडे गिरवले हे माहिती नाही

Khozmaster
1 Min Read

भादोला 🙁 विशेष प्रतिनिधी )

कारण 11 विद्यार्थ्यांनी यापूर्वी हातावर ब्लेड मारून स्वतःला जखमी करून घेतले होते. आता या मुजोर शिक्षकांनी संगणमत करून परीक्षेच्या दिवसात सामुहिक रजा टाकून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खेळ मांडला आहे. विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो. परंतु भादोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या 8 मुजोर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला कारणीभूत ठरत शिक्षणाचा खेळ खंडोबा करून ठेवला, असा आरोप होत आहे. या शिक्षकांनी सामायिक रजा टाकल्याचे कारण असे की, विद्यार्थ्यांच्या पालकांनी शालेय शिक्षण समितीला तक्रार केली होती. याचा राग मनात धरून सामाजिक रजा टाकण्यात आली आहे, असे कळते. ‘आमचे कोणी काही करू शकत नाही’या अविर्भावात हे शिक्षक असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन या शिक्षकांना चांगला धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे.

0 9 5 1 1 6
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *