चोरीस गेलेल्या दुचाकीचा १२ तासांतच लावला छडा

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )

चोरीस गेलेल्या दुचाकीचा अवघ्या १२ तासांतच छडा लावला. नव्हेतर चोरट्याला जेरबंद करत त्याच्या ताब्यातून दोन दुचाकी जप्त करत गुन्ह्याची यशस्वी उकल केली. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी बजावली.
बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दितून एक दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. घटनेच्या काही तासांतच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोलीस अंमलदार विजय वारुळे, विजय पैठने, गजानन गोरले, मंगेश सनगाळे, दीपक वायाळ, भारत जाधव, महिला पोलीस अंमलदार कोमल इंगळे, दिपाली चव्हाण व चालक पोलीस अंमलदार निवृत्ती पुंड यांनी गोपनीय माहिती काढून बुलढाणा शहरातील इंदिरा नगरमधून अन्वर उर्फ समीर हुसेन शेख याला ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता, त्याने एका सहकाऱ्याच्या मदतीने उपरोक्त गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात चोरलेली एचएफ डिलक्स कंपनीची दुचाकी व गुन्ह्यात वापरलेली पॅशन प्रो कंपनीची दुचाकी, असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. पुढील तपासकामी अरोपीस बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0 9 5 1 1 6
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *