बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )
राष्ट्रीय हरित सेना एडेड हायस्कूल व सामाजिक वनीकरण विभाग बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच विभागीय उपसंचालक विपुल राठोड, शाळेचे मुख्याध्यापक धनंजय किंबहूने, वनपरिक्षेत्र अधिकारी तोंडीरायता यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थ्यांनी पळस, बिट, पालक, कडूनिंब, हळद यांच्या पासून नैसर्गिक रंग तयार करून जनजागृतीसाठी बसस्थानकासमोरील प्रशासकीय इमारतीसमोर स्टॉल उभारला आहे. या स्टॉलला धुलिवंदन प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगांची जनजागृती करून तसेच माफक दरात विक्रीचे स्टॉलचे उद्घाटन उपसंचालक विपुल राठोड यांच्या हस्ते तसेच सामाजिक उपवनसंरक्षक अभय अटकळ, परीक्षेत्र अधिकारी तोडींरायता यांच्या उपस्थितीत पार पडले. पळसाच्या फुलांपासून केशरी पिवळा रंग, बिटापासून गुलाबी रंग तर हळदीपासून पिवळा रंग, पालक, कडूनिंब पासून हिरवा रंग तयार करण्यात आले आहेत. होळीच्या रंगपंचमीला घातक रासायनिक घटक द्रव्ये मिश्रीत रंगापासून डोळे, त्वचा नुकसान झाल्याचे अनेक उदाहरणे आपण बघीतले आहे. नैसगिक रंगाचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन राष्ट्रीय हरित सेना व सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आले. या उपक्रमासाठी हरित सेनेचे विद्यार्थी पवन शवंते, शार्दुल सराफ, आशिष इंगळे, आदित्य सोर, साईनाथ सोर, कुणाला जाधव वनश्री पुरस्कार प्राप्त हरी सेना प्रमुख आर. एन. जाधव तसेच वनसंरक्षक लक्ष्मी जाधव, रमेश गिते आदींनी परिश्रम घेतले.
Users Today : 64