पर्यावरण मित्रांची पर्यावरणपूरक होळी

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )

स्थानिक पर्यावरण मित्र तथा मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी बालाजी मंदिर परिसरातील सर्व कचरा साफ करून, एका ठिकाणी जमा करून कचरा पेटवून होळी साजरी केली. या अभियानामुळे बालाजी मंदिर परिसर स्वच्छ झाला आणि होळी सण देखील साजरा झाला. कोणत्याही झाडाला ईजा न करता आणि झाडाच्या फांद्या न तोडता परिसर स्वच्छ करुन होळी सण साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण मित्र तथा मॉर्निंग ग्रुपचे सदस्य प्रदिप डांगे, संजय अहीर, अनु माकोने, नितिन राऊत, सचिन श्रीवास, सावले, वराडे, दादाराव गायकवाड आदी उपस्थित होते .

0 9 5 1 1 6
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *