जातीयतेचे दाहक चटके विज्ञान युगातही विझेना…

Khozmaster
1 Min Read

मंठा 🙁 गजानन माळकर पाटील ) 

काळुबा महाराज यात्रा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथे शिवरात्री निमित्ताने यात्रा भरली गेली या यात्रेकरिता लेकी माहेरी येतात. त्यातच प्रार्थना राहुल शेजुळ , पती, मामा, नणंद सर्वजण मिळून दि. 28 फेब्रुवारी रोजी यात्रेमध्ये गेले असताना रहाट पाळण्यातून उतरल्यावर अनोळखी व्यक्ती पाठलाग करून जवळ येऊन मोबाईल नंबर मागून केसाला हाताला आणि साडीच्या पदराला वाईट हेतूने स्पर्श केला असता हा प्रकार पती राहुल यांनी पाहिला असताना लोखंडी रॉड ने जबर मारहाण केली.१)युवराज संजय जाधव २) पियुष गजानन राठोड ३)जितेश गजानन राठोड ४) सिद्धार्थ रमेश राठोड यांच्या विरुद्ध जातीवाचक मारहाण शिवीगाळ प्रकरण मंठा पोलीस ठाणे गुन्हा नोंद केला असून अधिक तपास डीवायएसपी दादाहरी चौरे आहेत. 14 दिवस उलटूनही उठली कारवाई होत नसल्याने ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मंठा पोलीस ठाणे अंमलदार निवेदन देताना रवी सदावर्ते, उपनगराध्यक्ष अरुण वाघमारे, शरद मोरे, समाधान शिंदे, मुकेश काऊतकर, महेंद्र टेकुळे आणि दहिफळ खंदारे येथील महिला पुरुष दरम्यान आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवी सदावर्ते यांनी दिला.

0 9 5 1 2 5
Users Today : 73
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *