गोकुळसिंग राजपूत :–(जामनेर प्रतिनिधी)
दि.१५/०३/२०२५
जामनेर: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० एक ते चार टप्पा प्रशिक्षण कार्यक्रम दि.११ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत इंदिराबाई ललवाणी विद्यालयात यशस्वीरित्या संपन्न झाले. या चार टप्प्यात प्राथमिक व माध्यमिक विभागातून एकूण १७३४ शिक्षकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षणार्थींना जिल्हास्तरीय सुलभक डॉ. रत्नकांत सुतार, प्रा.कैलास गायकवाड, प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.सचिन गडाख, शंकर भामेरे, राहुल महाजन, चंदू राजपूत, नितीन सैतवाल, शेख इब्राहिम, दत्तप्रसाद पाटील, विजय मानकर, सौ.संजीवनी ठाकूर, प्राथमिक विभाग जिल्हास्तरीय सुलभक रवींद्र कोळी, फकीरा मेढे, गणेश कोळी, नागनाथ खांडेकर, गणेश राऊत, अश्विनी कांबळे आदींनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे यांचे अनमोल मार्गदर्शन तर इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस.आर चव्हाण,उपप्राचार्य प्रा.के एन.मराठे यांचे अनमोल सहकार्य लाभले. शिक्षण विभाग पंचायत समिती प्रशिक्षण समन्वयक महेंद्र नाईक, गट साधन केंद्र सुलभक पंकज रानोटकर यांनी परिश्रम घेतले.
—————————— ——–
*फोटो कॅप्शन:* जिल्हास्तरीय सुलभक डॉ. रत्नकांत सुतार, शंकर भामेरे, प्रा.सचिन गडाख, प्रा.समीर घोडेस्वार यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देताना….
—————————— ———
Users Today : 72