पळसखेड भट येथील दोन युवकांचा अपघातात मृत्यू

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )

तालुक्यातील पळसखेड भट येथील विठ्ठल पांडूरंग चिंचोले। (सेवानिवृत्त कोतवाल) यांचा मोठा मुलगा, स्वधर्मराज विठ्ठल चिंचोले वय ३२ वर्ष व सुधाकर सिताराम मोहिते यांचा मुलगा स्व. शंकर सुधाकर मोहिते वय २५ वर्ष हे संभाजीनगर येथून दि. १४/३/२०२५ रोजी संध्याकाळी भोकरदन मार्गे पळसखेड भट येथे आपल्या गावी येत असताना भोकरदन मार्गावर  हिरेगाव जवळ दोघांचा अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने अपघात झाला. त्यांना उपचारासाठी संभाजी नगर येथे घाटी रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून पळसखेड येथे दि. १५/३/ २०२५ रोज शनिवार ला दुपारी २ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. घटनेने पंचक्रोशीत हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

0 9 5 1 2 4
Users Today : 72
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *