खामगाव :- ( तालुका प्रतिनिधी )
धुळवडीच्या आनंदात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल तालुक्यातील शेलोडी शिवारात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अग्रवाल यांचा भाचा क्षितिज मनोज अग्रवाल मृतक क्षितिज अग्रवाल येथील आईसाहेब मंगल कार्यालयाच्या मागील संभाजी नगर भागातील राम पुरुषोत्तम हा काल १४ मार्च रोजी धुळवडीचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांसोबत शेलोडी शिवारातील एका खदानीवर पोहायला गेला होता. यावेळी पाण्यात पोहताना अचानक तो बुडाला. यामुळे घाबरलेल्या मित्रांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने क्षितिज याला मृत अवस्थेत पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे .
Users Today : 72