चौदा गावाच्या शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी कैलास नागरेंचे बलिदान

Khozmaster
3 Min Read

देऊळगाव राजा 🙁 तालुका प्रतिनिधी )

14 गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा यासाठी अनेकवेळा अन्नत्याग उपोषण, आमरण उपोषण, आंदोलने करण्यात आली. परंतु आजपर्यंत प्रशासनाने उपोषण कर्त्यांला फक्त लेखी आश्वासनाची खैरातच दिली. शासनाच्या या वेळ काढू धोरणाला कंटाळून (दि.13) मार्च रोजी गुरुवारला होळी या सणाला शेतकरी आंदोलक कैलास अर्जुनराव नागरे यांनी 14 गावाच्या शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी विष प्राशन करून स्वतः हाचे जिवन संपवून शेतकऱ्यांसाठी बलिदान दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना हरितक्रांतीचे स्वप्न दाखवणाऱ्या संतचोखा सागर (खडकपूर्णा प्रकल्पात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतांना देखील रत्यार 14 गावाच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळत नसल्यामुळे मागील गेल्या अनेक वर्षांपासून कालव्याद्वारे पाणी मिळावे यासाठी संघर्ष सुरु आहे. 14 गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा यासाठी अनेकवेळा अन्नत्याग उपोषण, आमरण उपोषण, आंदोलने करण्यात आली. परंतु आजपर्यंत प्रशासनाने उपोषण कर्त्यांला फक्त लेखी आश्वासनाची खैरातच दिली. शासनाच्या या वेळ काढू धोरणाला कंटाळून (दि.13) मार्च रोजी गुरुवारला होळी या सणाच्या दिवशीचं महाराष्ट्र राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी आंदोलक कैलास अर्जुनराव नागरे वय 44 रा. शिवणी शेतकऱ्याने आरामाळ ह्या 14 गावाच्या शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी विष प्राशन करून स्वतः हाचे जिवन संपवून शेतकऱ्यांसाठी बलिदान दिले. मृतक कैलास नागरे यांच्या मृतदेहाजवळ त्यांनी स्वअक्षरात लिहून ठेवलेली चिट्ठी सापडली. त्यामध्ये मा. राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण मला वादा करा, माझ्या पंचक्रोशीतील शेतीला हमी पाणी द्या कारण आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत. फक्त शेतीला शेतीला हमी पाणी नाही. म्हणून पूर्ण वेळ शेतकऱ्यांच्या पिके घेण्यासाठी सातत्य राहत नाही. म्हणूनचं त्यांना आर्थिक समतोल बिघडतो अन.. तो कर्जबाजारी होतो. वैफल्य येऊन तो नैराश्याच्या गरतेत आणि त्याला जिवन जगणे असाह्य होते. यासाठी खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी देण्यात यावे, असे चिट्ठीत नमूद केले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त करत जोपर्यंत मृतक कैलास नागरे यांची मागणी शासन स्तरावरून जोपर्यंत मान्य होत नाही. तोपर्यंत कैलास नागरे यांचा मृतदेह हलवणार नाही. त्याचबरोबर कोणतीही उत्तरक्रिया होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती, याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायबतहसीलदार सायली जाधव, अंडेरा ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्यासह लोकप्रतिनिधी व शेतकरी नेत्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. मृतक नागरेंनी लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये मनसून्न करणारे शब्द गट नंबर 60 मध्ये पपईच्या शेतात माझा अंत्यसंस्कार करा. माझी राख आमच्या आनंदस्वामी धरणात टाका अन.. रक्षा विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी आटोपून कृपाया सर्वांनी आपआपल्या कामाला लागावे. माझी बहीण, भाऊजी, माझे पालकच होते. माझ्या पत्नीचे करावे कौतुक तेवढे थोडेच आहे. ती माझ्यापेक्षा शेतीवर जास्त प्रेम करणारी. ती माझ्यासोबत प्रामाणिक वचनबद्ध होती. शेती करत असताना मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकलो नाही. मात्र आज मी त्यांना पोरका करून चाललो. परंतु आता माझ्या मुलांचे पालकतत्व सरकाने स्विकारावे, अशी मनसुन्न करणारे शब्द स्वअक्षरात लिहलेले आहेत .

0 9 5 1 2 4
Users Today : 72
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *