राज्याचा कारभार शेतकरी विरोधी लोकांच्या हाती : जयश्रीताई शेळके

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी) 

सत्तेत वसलेल्यांना शेतकऱ्यांशी काही घेणे देणे नाही. अशा लोकांच्या हाती आपण सत्ता देऊन बसलो. खरं म्हणजे हे महाराष्ट्राचे दुदैव आहे. पाण्यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते यापेक्षा अजून कोणता वाईट दिवस पहायचा बाकी आहे? असा सवाल शिवसेना (उबाठा) नेत्या जयश्री शेळके यांनी केला आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. शेतीला पाणी मिळत नसल्याने वैतागून या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. यासंदर्भात शिवसेना नेत्या जयश्री शेळके यांची (दि. 13) मार्च रोजी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा असो मी मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जाते. विरोध करणाऱ्यांना बाजूला सारुन भेदभाव केला जातो. प्रत्येक प्रकल्पा शेजारील शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. याबाबत शासनाने गंभीरपणे घेण्याची आवश्यकता असल्याचे जयश्री शेळके म्हणाल्या .

0 9 5 1 2 4
Users Today : 72
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *