शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केले कै. कैलास नागरेंच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Khozmaster
2 Min Read

सिंदखेडराजा 🙁 तालुका प्रतिनिधी )

खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शेतशिवारात खेळून शेती समृद्ध व्हावी, यासाठी बलिदान देणारे कै. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. संपूर्ण शेतकरी तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही प्रशासकीय पातळीवर लढा उभा करू, अशी ग्वाही रविकांत तुपकर यांनी या कुटुंबीयांना दिली. तसेच, दुखातून सावरण्यासाठी मार्गदर्शन केले. राज्यातील फडणवीस सरकारच्या नावाने व्यवस्थेला कंटाळून पत्र लिहून आत्महत्या करणारे शहीद शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या निवासस्थानी शिवणी आरमाळ येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज भेट दिली. संपूर्ण शेतकरी बांधव नागरे कुटुंबीयांच्या पाठीशी उभे असल्याचा शब्द त्यांनी दिला. या दुर्देवी घटनेनंतर नागरे कुटुंबीय कोसळून पडले आहे. कै. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा व त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. राज्य सरकारने तातडीने या भूमिपुत्राला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली. तसेच, त्यांनी परिसराच्या सिंचनासाठी बलिदान दिले. हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लढा उभा करू, अशी ग्वाहीही रविकांत तुपकर यांनी याप्रसंगी दिली. तसेच, कोन्हाळा बाजार (ता. मोताळा) येथे विनायक गायकवाड यांच्यावर शस्रक्रिया झाल्याने त्यांची भेट घेऊन तब्बेतीची चौकशी केली. तसेच श्रीकृष्ण वाघ यांचे नानमुख कार्यक्रमाला भेट देऊन विवाहाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल सोनुने यांच्या घरी गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. अंत्री येथे सरपंच सचिन महाजन यांचे आजोबांचे स्व. गणपत महाजन यांचे निधन झाल्याने त्यांचेही कुटुंबीयांची भेट घेतली. बुलढाणा तालुक्यात वरवंड येथे स्व. रामभाऊ जेऊघाले यांचे दुखद निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. खूपगाव येथे श्री श्रीराम नावकर यांच्या आईचे दुखद निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंदखेडराजा तालुक्यात निमगाव वायाळ येथे पत्रकार सुरेश हुसे यांचे वडील लक्ष्मण ग्यानुजी हुसे यांचे दुखद निधन झाले, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आधार दिला. तसेच गारगुंडी येथे भगवान काकड आणि सुरेश काकड या दोन्ही उमद्या नेतृत्वाला हृदयविकाराने एकाच दिवशी गाठले. दोन्ही काकड कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

0 9 5 1 4 2
Users Today : 90
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *