गोकुळसिंग राजपूत :–(छत्रपती संभाजीनगर)
वैजापूर /संभाजीनगर-ता.१७
महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक बांधिलकी जपत
सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन माणुसकीचे नाते जपणाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्धेशिय सेवा भावी संस्थेच्या वतीने त्यांच्या माणुसकीच्या कार्याच्या आठव्या वर्धापन दिन व राम सुमित पंडित यांच्या सातव्या वाढदिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवार(ता,१५)रोजी येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात शाल, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रथम स्वच्छतादूत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी व्यासपीठावर त्रिपुरा विद्यापीठाचे कुलुगुरु प्रा. प्रकाश करमाडकर,वडोद बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील इंगळे,चिकलठाणा पोलीस स्टेशनचे
स.पो.नि.संजय खंडागळे,वेदांतनगर पोलीस स्टेशन चे
पोलीस निरीक्षक,व प्रसिद्ध खंजिरी वादक पंकज राठोड,
हभप विजय गवळी,प्रसिद्ध उद्योजक मनोज कदम,हभप श्याम महाराज,सुनील कोतकर, सी.ए.काटकर,शरद सोनवणे, जालना मनपा च्या उपायुक्त नंदा गायकवाड व जेष्ठ साहित्यिक व समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक प्रा,सोनवणे यांनी केले ते
म्हणाले की, या संस्थेचे सर्वे सर्वा सुमित पंडित व
पूजा पंडित हे दोघेही पती पत्नी सामाजिक कार्याचा वसा घेऊन समाज सेवा करीत आहेत,ज्यांना कुणाचाही आधार नाही ,त्यांना आधार देणे,या शिवाय
माणुसकी वृद्ध सेवालय मार्फत दीन, दुबळे,व निराधाराना आश्रय देऊन त्यांची सेवा करणे,जलसुरक्षा,वृक्षारोपण, मुली जन्माचे स्वागत,अन्नदान शिबीर,”बेटी बचाओ-बेटी पढाओ”
प्रबोधन, संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांचा स्वच्छता संदेश, जुन्या अनिष्ट रूढी, परंपरा त्यागणे, व्यसन व विकारांच्या दुष्परिणाम चे प्रबोधन करणे,अंधश्रद्धा निर्मूलन अशी विविध कामे आपल्या पत्नी पूजाला सोबत घेऊन मित्र परिवाराच्या वतीने करीत आहेत.तसेच राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा गौरव इत्यादी कार्य करीत आहेत,असे सोनवणे यांनी प्रास्ताविकात विशद केले.उपस्थितांनी सुमित व पूजा पंडित यांच्या या कार्याचा गौरव केला. उपस्थिताना जागेवर खिळवून ठेवणारे सूत्र संचलन श्री कांबळे यांनी केले तर आभार सुमित पंडित यांनी मानले.पुरस्कारर्थीत माझा मराठवाडा चे संपादक दशरथ सुरडकर,पोनि, सुनील इंगळे,संजय खंडागळे, श्री ,शिंदे,श्रीमती मनीषा घोडे या सारख्या मान्यवरांचा समावेश होता.शेवटी सामूहिक राष्ट्रगीताने कार्यकर्माची सांगता झाली.
.(फोटो कॅप्शन-कार्यक्रम अध्यक्ष डॉ.करमाडकर संबोधित करतांना)