चिखली 🙁 तालुका प्रतिनिधी )
एकात्मिक बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र आहे. चिखली तालुक्यासह शेजारच्या दुसऱ्या तालुक्याचा अतिरिक्त भार एकाच अधिकाऱ्यावर असल्याने वेळेअभावी कामांवर परिणाम होत आहे. एकात्मिक बालविकास विभागाच्या कामात पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर नियंत्रण ठेवणे, अंगणवाडी केंद्रांना भेटी देणे, पोषण आहाराचे नियोजन करणे, बालकांच्या आरोग्याची तपासणी करणे, महिला व बालविकास योजनांची अंमलबजावणी करणे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश असतो. एका अधिकाऱ्याकडे दोन तालुक्यांचा कारभार असल्यामुळे त्यांना एकाच वेळी दोन ठिकाणी लक्ष देणे शक्य होत नाही. परिणामी, कामांना विलंब होतो आणि काही कामे अपूर्ण राहतात. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामावरही परिणाम होतो. तसेच, महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होतात. एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी, प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत. यामुळे कामांमध्ये अधिक सुसूत्रता येईल आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होईल. एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांवरील कामाच्या अतिरिक्त ताणामुळे नागरिकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वेळेवर मार्गदर्शन न मिळाल्याने महिला व बालविकास योजनांचा लाभघेणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाने लक्ष वेधण्याची गरज :-एकात्मिक बालविकास विभागातील अधिकाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यास, कामांमध्ये सुधारणा होईल आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.
खामगावच्या प्रभारामुळे मिळेना वेळ :- चिखली येथील प्रकल्प अधिकारी राजेश वाघ यांच्याकडे खामगावच्या पदाचा देखील भार असल्याने त्यांना कार्यालयात काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. दोन तालुक्यातील अंगणवाड्यांना भेटी देणे अशक्य असून त्यामुळे अनेक समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. कार्यालयात उपस्थित राहता येत नसल्याने कार्यालयाचा परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कार्यालयात कार्यालयप्रमुखच हजर नसल्याने त्यांनी हवी असलेली माहितीदेखील मिळत नाही. महत्त्वाच्या विषयाची माहिती हवी असली तरी याठिकाणी असलेले अधिकारी वरिष्ठांना विचारून सांगतो, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे याठिकाणी चालले तरी काय? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे .
Users Today : 92