बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )
अकोला परिमंडळाअंतर्गत २६४ कोटी रुपयांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. महावितरणच्या मोहिमेत वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील ३ हजार २८३ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. एकूण थकबाकी आणि आणि पुनःर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नाही. त्यामुळे महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे. परिमंडळाअंतर्गत विविध वर्गवारीतील सुमारे १५ लाख ग्राहकांना महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येतो. तथापि फेब्रुवारी अखेर कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्याचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे २६४ कोटी रुपये वीजबिल थकल्यामुळे महावितरणपुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. थकबाकीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे महावितरणने वीज बिल वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे. परिमंडळाअंतर्गत पुढील १८ दिवसांत कराव्या लागणाऱ्या एकूण २६४ कोटी रुपयांच्या थकीत विजबिलामध्ये अकोला जिल्ह्यातील ८८ कोटी ४७लाखांचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातून १२९ कोटी ३३ लाख आणि वाशीम जिल्ह्यातून ४६ कोटी ५५ लाख वसूल होणे अपेक्षित आहे. तथापि मार्च
- पुर्नजोडणी शुल्काचा आर्थिक भुर्दंड बसणार
वीज ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक आहे. महावितरणची कारवाई झाल्यानंतर संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्याची नोंद महावितरणच्या ऑनलाइन प्रणालीत करावी लागते. त्यामुळे सिंगल फेज ग्राहकांना ३१० रुपये अधिक जीएसटी आणि ३ फेज ग्राहकांना ५२० रुपये अधिक जीएसटी पुनःर्जोडणी शुल्क भरावेच लागणार आहे. त्यामुळे होणारा मनस्ताप, आर्थिक दंड आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 90