बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )
संस्कृत भाषा ही बहुविध शद्वांचे भंडार असून, दैनंदिन जीवनातही संस्कृत भाषेच्या सुसंवादातूनच भाषा जिवंत राहू शकते. भारतीय संस्कृतीवर परकीयांची असंख्य आक्रमणे झाली. परंतु, भारताने नेहमीच संपूर्ण विश्वाला आपले कुटुंब मानले आहे. उच्च शिक्षणाचे अध्ययन करतानाच वैयक्तिक जीवनात सुखी समृद्धहोण्यासाठी संस्कृत भाषेचे महत्त्वही स्मरणात ठेवावे. आपल्या भारतीय संस्कृतीचे उच्च जीवनमूल्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प सर्व भारतीयांनी करावा. संस्कृत भारती राष्ट्राच्या विकासासाठीच कार्यरत आहे. संपूर्ण समाजाने या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन शारदा ज्ञानपीठच्या मुख्याध्यापिका उल्का अंतरकर यांनी केले.
येथील संस्कृत भारती शाखेतर्फे आयोजित दहा दिवसीय संस्कृत संभाषण प्रशिक्षण वर्गाचा समारोप स्थानिक द व्हिजन इंग्लिश स्कूल चैतन्यवाडी येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या मार्गदर्शन करीत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिवानंद भुसारी, संभाषण वर्ग संयोजक नूतन सवडतकर, जती पुलडाणा ।। नगरमंत्री हर्षा दामले, पौर्णिमा महाजन उपस्थित होते. समारोपाच्या कार्यक्रमात संस्कृती कानडजे कथावाचन वेदिका दामले, शोनक जोशी, परस्पर संवाद अक्षदा फाटे, श्रुती वैराळकर, सुभाषित माला प्रांजल अवचार, समीक्षा साडू, विभक्ती माला वैशाली जोशी, गीत प्रा. सखाराम जोशी अनुभव कथन यांनी संस्कृत भाषेत सादर केले. समारंभाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी, भारत माता पूजन, दीपप्रज्वलाने झाला. अध्यक्ष शिवानंद भुसारी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शहरातील शंकरराव साळुंके, बाबासाहेब वरणगावकर, सुनील पिंगळे, विनोद राऊत, कानडजे, नरेंद्र उके उपस्थित होते. प्रास्ताविक परिचय हर्षा दामले, नूतन सवडतकर, तर आभार डॉ. शारदा वाघ व संचालन पौर्णिमा महाजन यांनी केले.
Users Today : 91