विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य विकसीत करणे आवश्यकः डॉ. सूरजप्रसाद शुक्ला

Khozmaster
1 Min Read

संग्रामपूर 🙁 तालुका प्रतिनिधी)

अलीकडील स्पर्धेच्या युगात रोजगार ही ज्वलंत समस्या असताना प्रभावी संवाद कौशल्य रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य विकसीत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सूरजप्रसाद शुक्ला यांनी केले. वरवट बकाल येथील कला वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे १० मार्च रोजी पार पडलेल्या अतिथी व्याख्यानात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संवाद विकसीत करणे का आवश्यक आहे, तसेच त्यासंबंधी विविध पद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. निशिगंध सातव, डॉ. सुभाष
गुर्जर, डॉ. संजय टाले यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नागेश इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विभाप्रमुख डॉ. निशीगंध सातव यांनी केले. या प्रसंगी तीनही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

0 9 5 1 7 4
Users Today : 122
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *