बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे १८ आणि १९ मार्च रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गर्दै वाचनालयाच्या सभागृहातील या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, कविसंमेलन, व्याख्याने, तसेच विविध बहुरंगी कार्यक्रमाचे होणार आहे.
१८ मार्च रोजी हुतात्मा स्मारकापासून – गर्दे वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात – येणार आहे. साहित्यीक अर्चना देव यांच्या – हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. – यावेळी नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश – पांडे, शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, गर्दै वाचनालयाचे अध्यक्ष गोकुल शर्मा उपस्थित राहणार आहे. सकाळी ११ वाजता केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर तसेच आ. किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर उपस्थित राहणार आहेत. दुपारी २.३० ते ५ वाजेदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी’ या विषयावर डॉ. एस. एम. कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार आहे. यामध्ये डॉ. गजानन जाधव, डॉ. कि.वा. वाघ, सुनिल वायाळ, नेमीनाथ सातपुते सहभागी होणार आहेत. १९ मार्च रोजी सकाळी ‘कृत्रीम बुद्धीमत्ता वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम’ या विषयावर प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. अरुण नन्हई, महेंद्र बोर्डे सहभागी होणार आहेत. दुपारी १.३० वाजता ‘वाचन चळवळीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान’ या विषयावर डॉ. अनंत सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजेंद्र गणगे, देविदास समुद्रवार, सुनिल झोरे, अनंत सातव, रामेश्वर गायकी, विष्णू इंगळे सहभागी होतील. दुपारी ३ वाजता डॉ. सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन. यामध्ये नितीन वरणकार, अरविंद शिंगाडे, राम सोनोने, सर्जेराव चव्हाण, कडुबा बनसोडे, धनंजय मन्डे सहभागी होतील. दोन दिवशीय ग्रंथोत्सवाला जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच नागरिकांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे
Users Today : 119