पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेसोबत सामाजिक संदेश मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंगणात उभारल्या पशुपक्ष्यांसाठी निवारा आणि सोयी

Khozmaster
2 Min Read

 

मलकापूर 🙁 तालुका प्रतिनिधी )

मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अंगणी, झाडाच्या खोडावर वेलींची राणी, उन्हाळ्याच्या उन्हात, तप्त झाली धरणी, पशुपक्ष्यांना मिळाला, शीतल आसरा अन् चारा पाणी या ओळी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सध्या उन्हाळ्याच्या दिवसांतील ठाण्याच्या अंगणातील झाडाच्या खोडावर-लोंबकळणाऱ्या फांद्यांवर पशुपक्ष्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधासाठी ततोतंत जुळतात. पोलिसांच्या या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून नेहमीच कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन केले जाते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस नेहमीच तत्पर असतात. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच पोलीस सामाजिक संदेशही देत असतात मलकापूरच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात असाच एक सामाजिक संदेश दिला आहे.पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता, परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सोबतच मोठ्या वृक्षांच्या फांद्यावर आकर्षक रंग रंगोटी केलेल्या मातीची भांडी लटकत त्यामध्ये पक्ष्यांना पिण्याकरिता पाणी व भूक भागविण्याकरिता दाणे टाकले जात आहे. हा परिसर गावाच्या बाहेर असल्याने वृक्षांवर विविध पक्ष्यांनी घरटी बांधली आहेत. या घरट्यांमध्ये विविध प्रकारचे पक्षी सुरक्षितपणे आश्रय घेत आहेत. विविध फुलपाखरे व पक्ष्यांचा हळूहळू वावर वाढत चालला असून परिसरात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच सामाजिक बांधिलकी जपल्याचे नागरिक बोलत आहे. मुके जीव वाचतील उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते. पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते. या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज असते, वाटीभर पाण्याची. प्रत्येकाने एक जरी भांडे पक्ष्यासाठी ठेवले तर त्याचा फायदा लाखो पक्ष्यांना होऊन हजारो मुके जीव वाचतील, असे मत सुद्धा य याप्रसंगी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी व्यक्त केले. पोलिसांकडून मानवतेचा संदेश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे गेल्या काही वर्षांत विपुल वन संपदेमधील मोठ्या प्रमाणात होत असलेली झाडांची कत्तल, दिवसेंदिवस वाढते सिमेंटचे जंगल, घटते वनक्षेत्र पर्यावरणातील बदलामुळे वन्यजीव तसेच अनेक पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. तर मलकापूर ग्रामीण पोलिसांनी राबविलेला उपक्रम प्रेरणादायी तसेच समाजातील सकारात्मक दृष्टिकोन वाढीला मदत होणार आहे .

0 9 5 1 7 2
Users Today : 120
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *