सैलानी बाबांची संदल पिंपळगाव सराई येथून आज निघणार सैलानी यात्रेचा मुख्य सोहळा: भाविकांमध्ये उत्साह

Khozmaster
2 Min Read

पिंपळगाव सराई:-( विशेष प्रतिनिधी )

बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथील सैलानी बाबांचा संदल बुधवार (दि. १९) रोजी रात्री पिंपळगाव सराई येथून सैलानीकडे प्रस्थान करणार आहे. पहाटे हा संदल सैलानी बाबांच्या दर्यावर पोहोचेल, जिथे फुलांची चादर, सुगंधी द्रव्ये, चंदनाचा लेप आणि अन्य धार्मिक साहित्य अर्पण केले जाणार आहे. संदल रात्री आठ वाजता पिंपळगाव
सराई येथून जुन्या पाणंद रस्त्याने निघणार आहे. सैलानी यात्रेतील हा प्रमुख आकर्षणाचा भाग असल्याने परभणी, बीड, जिंतूर, तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि हैदराबाद येथून मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. अमरावती विभागातून २५० पोलिस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, ३१ अधिकारी आणि दोन दंगाकाबू पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील परिस्थितीवर सतत नजर ठेवन आहेत.भाविकांसाठी प्रशासनाचे आवाहन संदल प्रस्थानावेळी काही भाविक उंटावर नारळ फेकतात, ज्यामुळे संभाव्य अपघात होऊ शकतो. त्यामुळे भाविकांनी नारळ न फेकण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, यात्रेनंतर वाहने सुरक्षितरित्या बाहेर काढून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी केले आहे.
पिंपळगाव सराईत गर्दी पिंपळगाव सराई येथून संदल निघणार असल्याने दर्शनासाठी मंगळवारपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बुधवारी दुपारनंतर या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाव परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती सत्रांनी दिली.

 

0 9 5 1 7 1
Users Today : 119
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *