पाण्याअभावी कोनड खुर्दच्या फळबागा संकटात! खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी

Khozmaster
2 Min Read

चिखली:-( तालुका प्रतिनिधी )

कोनड खुर्द गावातील शेतकरी गट शेती आणि फळबागांच्या माध्यमातून स्वावलंबी शेतीचा आदर्श निर्माण करत आहेत. मात्र, सध्या पाण्याअभावी त्यांची संपूर्ण मेहनत वाया जाण्याची भीती आहे. २८ फेब्रुवारीपासून गावातील फळबागांना पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्र. ४ मधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांनी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.१७५ एकर शेतीसाठी सिंचनाचे एकमेव स्रोत आहे.कोनड खुर्द हे सुमारे १३०० लोकसंख्येचे गाव संपूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. डाळिंब, आंबा, पेरू, सीताफळ आणि कांदा बीजोत्पादन यामुळे गावाची ओळख निर्माण झाली आहे. १७५ एकर शेतीसाठी सिंचनाचे एकमेव स्रोत कोनड बु, (जि. जालना) येथील लघु प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पातून दरवर्षी २८ फेब्रुवारीनंतर पाणी उपसा थांबतो, यामुळे फळबागांना मोठा फटका बसतो. यावर्षीचीही परिस्थिती पहाता मागणी करण्यात आली आहे. १५० एकरांवर फळबागा कोनड खुर्दमध्ये १५० एकरांवर फळबागा, २५ एकरांवर कांदा बीजोत्पादन, तसेच १० पेक्षा जास्त शेडनेट हाऊसेस आहेत. सध्या या संपूर्ण क्षेत्रावर पाण्याअभावी गंभीर संकट निर्माण झाले आहे. येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत आभाळमाया अॅग्रो प्रोड्युसर कंपनी व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून फळप्रक्रिया उद्योग सुरू केला आहे, परंतू तो धोक्यात येत आहे. कालव्याचे पाणी अडवले जात असल्याचा आरोप खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्र. ४ च्या कालव्यामधून कोनड शिवारात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी यासाठी २०२३ मध्ये शासनाकडे भरणादेखील केला आहे. मात्र, मलगी आणि दे. घुबे परिसरातील काही शेतकरी कालवा फोडून पाणी त्यांच्या पाझर तलावात अडवत असल्यामुळे कोनडपर्यंत पाणी पोहोचत नाही,प्रक्रिया उद्योग धोक्यात!पाण्याच्या समस्येमुळे येथील प्रक्रिया उद्योगही आता अचडणीत येण्याची शक्यता आहे. गुणवत्तापूर्ण फळांची मोठी मागणी राहाता, सांगोला आणि नाशिक बाजारात असते. पाण्याअभावी शेतीच उद्ध्वस्त झाली, तर शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सरकारने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शेकऱ्यांनी केली आहे.

0 9 5 1 7 1
Users Today : 119
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *