भादोला जिल्हा परिषद शाळेतील वाद निवळला!

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-( जिल्हा प्रतिनिधी )

शहरापासून सुमारे आठ किमी अंतरावर असलेल्या भादोला जिल्हा परिषद शाळेत काही विद्यार्थ्यांनी खेळाच्या नादात स्वतःला ब्लेडने जखमी केल्याने पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये निर्माण झालेला वाद १७मार्च रोजी झालेल्या बैठकीत अखेर मिटला आहे.बुलढाणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पंढरी वत्सला श्रीराम मोरे यांनी दोन्ही बाजूंची बैठक घेत समन्वय साधत हा प्रश्न सोडवला. ११ मार्च रोजी काही विद्यार्थ्यांनी खेळताना हातावर ब्लेडने जखमा केल्या. यामुळे त्यांच्या सुरक्षेवरून पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने नाराजी व्यक्त करत शाळाबंद आंदोलन पुकारले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर शिक्षकांकडे अपेक्षित लक्ष नाही, असा आरोप पालकांनी केला होता. या प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी चौकशीसाठी गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांना नेमले. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांविरोधात सामूहिक रजा मागणी केली. त्यामुळे हा वाद कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

0 9 5 1 7 2
Users Today : 120
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *