कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार दगावला

Khozmaster
1 Min Read

खामगाव:-( तालुका प्रतिनिधी )

भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार वाईंडर कस्तुरे हे जागीच ठार झाल्याची घटना गारडगाव फाट्याजवळ १७ मार्च रोजी संध्याकाळी वाजेदरम्यान घडली.कंचनपूर येथील मुळ रहिवासी तथा सध्या अंत्रज येथे वास्तव्यास असलेले विनोद अशोक कस्तुरे (वय ४०) हे खामगाव तहसील कार्यालयाच्या वाईंडर म्हणून आवारात काम करतात. सोमवारी वाईंडरचे काम आटोपून ते त्यांच्या एमएच २८-एसी ४५६९ या क्रमांकाच्या दुचाकीने घरी अंत्रज येथे जात होते. यावेळी उपरोक्त ठिकाणी एनएल ०१-के ९७६८ या क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये वाईंडर विनोद कस्तुरे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य केले. त्यानंतर रुग्णवाहिकेने कस्तुरे यांचा मृतदेह खामगाव रुग्णालयात सामान्य शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, २ मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेवून पोस्टेला जमा केला असून गुन्हा दाखल केला आहे.

0 9 5 1 7 4
Users Today : 122
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *