वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Khozmaster
1 Min Read

नांदुरा:-( तालुका प्रतिनिधी )

वडनेर भोलजी जवळील विश्वगंगा हॉटेल समोर अज्ञात वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली होती. याप्रकरणी १६ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्यादी सुभाष कैलास वडर (शिंदे) रा. वाकी तालुका जामनेर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांचे काका प्रकाश उत्तम वडर (शिंदे) सोबत एमएच १९ ई-डी ८०१४ या क्रमांकाच्या दुचाकीने पारखेड येथून जामनेरकडे येत होते.यावेळी विरुद्ध बाजूने येणाऱ्या अज्ञात वाहन चालकांने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. यावेळी पाठीमागे बसलेले प्रकाश उत्तम वडार (शिंदे) व फिर्यादी हे जखमी झाले. तर दुचाकी चालक विजय आनंदा शिंदे (वय ३०) रा. वाकी यांचा दवाखान्यात उपचारा दरम्यान ८ मार्चला मृत्यू झाला. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुभाष कैलास वडर शिंदे यांनी १६ मार्चला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०६ (१), २८१, १२५ (ए) कलमाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ भारसाकळे करीत आहेत.

0 9 5 2 2 0
Users Today : 168
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *