नाटक समाजावर प्रभाव पाडणारे प्रभावी माध्यम : उषाताई खासबागे

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-( जिल्हा प्रतिनिधी )

नाटक हे समाजमनावर प्रभाव पाडणारे उत्तम माध्यम आहे. त्याचा वापर मनोरंजनासोबत प्रबोधनासाठी व्हावा, असे सांगून नाट्यकलावंतांनी छंद जोपासताना अर्थसाक्षर होणे गरजेचे असल्याचे मत, नाट्यलेखिका तथा कवयित्री उषाताई खासबागे यांनी व्यक्त केले.अक्षरदेह नाट्यकला संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मागील ४० वर्षातील ४० महिला नाट्यकलावंतांचा सत्कार गोवर्धन हॉल येथे १२ मार्च रोजी करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रारंभी कांदबरीकार अर्चना देव, प्रसिद्ध साहित्यिक उषाताई भालेराव यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योजिका अलका बंगाळे, डॉ. निलिमा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्यावतीने रुचिरा पाटील, सुरेखा इंगळे, सुषमा राणे, आशा मानवतकर यांनी स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी अर्चना देव, उषाताई भालेराव, अलका बंगाळे, डॉ. निलिमा जाधव, शोभा आरस यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात बेबीताई खानझोडे, शोभा आरस, रत्नावली काचकुरे, अंजली परांजपे, रंजना बोरीकर, माधवी नाईक, सुवर्णा कुळकर्णी पावडे, ज्योती मुळे, मीरा दलाल, रेणू जोशी महामुने, देवीश्री ठाकूर, अर्चना जाधव, डॉ. साधना भवटे, कविता वरकडे धुर्वे, कल्याणी काळे, मनिषा पापडकर काळे, शीतल पराग काचकुरे, वैशाली पापडकर पोतदार, रोहिणी देशमुख, संध्यावली मयुरे, शिल्पा डुकरे डोळे, अंकिता नाटेकर, वैशाली कस्तुरे, स्वाती बोराडे अपार, वैष्णवी गोरे-अहिर, स्वाती राठोड चव्हाण, मोनाली ढोके, शिवानी मोरे देशमुख, वैष्णवी राऊत जाधव, रुपाली दांडगे इंगोले, भक्ती विनोद लहाने, ऋचा श्रीराम पुराणिक, श्रुती माने, सांची शशिकांत इंगळे, श्वेता आराख, निकिता मोरे हिवाळे, शुभांगी आराख-अंभोरे, डॉ. गिरीबाला प्रशांत सोनुने, पूजा शिरसोले, अमरजा आरस या महिला नाट्य कलावंतांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुरेखा इंगळे यांनी केले. संस्थेचा अहवाल रुचिरा पाटील यांनी सादर केला. संचालन मृणाल सावळे यांनी केले तर आशा मानवतकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षरदेहचे पदाधिकारी डॉ. दुर्गासिंग आधव, शशिकांत इंगळे, संतोष पाटील, शैलेश वारे, गणेश राणे, विलास मानवतकर यांच्यासह अॅड. गणेश देशमुख, पराग काचकुरे, दिनेश उचाडे, गजानन सुरोशे, विजय सोनोने, जयंत दलाल, सृजन इंगळे व स्वाती दलाल यांनी परीश्रम घेतले.

0 9 5 2 1 9
Users Today : 167
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *