मलकापूर:-( तालुका प्रतिनिधी )
स्थानिक पद्मश्री डॉ.व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उद्योग व शिक्षण यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पार पडलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये टेनेकॉ क्लीन एअर इंडिया कंपनीमध्ये ३२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.टॅलेंट कॉर्प प्रा. लि. च्या एचआर प्रतिनिधी पूजा नागपूरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये एकूण १२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी विविध टप्प्यांमधून मुलाखती घेण्यात आल्या. कठोर प्रक्रियेतून ३२ विद्यार्थ्यांची कनिष्ठ अभियंता या पदावर निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक २.८ ते ३.० लाखांचे वेतन देण्यात येणार आहे. प्लेसमेंट ड्राइव्हची सुरुवात प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रा. संगीता खर्च यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अकॅडमिक डीन डॉ. वाय.ए. खर्चे, प्रा.आर.एम. चौधरी, प्रा.एस आर. शेकोकर, प्रा.पी.व्ही.चोपडे, प्रा.मनीष आचेलिया, प्रा.एस. एम.भोळे, प्रा.ए.डी.तांबे आणि प्रा. प्रतीक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाने पुढील काळात अजून मोठ्या प्रमाणावर उद्योग क्षेत्राशी जोडणी करून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन रोजगार संधी निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील अंतर कमी करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. अरविंद कोलते व सुधीर पाचपांडे यांनी केले.
Users Today : 169