खामगाव:-( तालुका प्रतिनिधी )
एका वृत्तपत्रातील संपादकीय लेखात चुकीचे व आक्षेपार्ह लिखाण करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अॅड. शेखर जोशी यांनी उध्दव ठाकरे, संजय राऊत व सुभाष देसाई यांच्या विरूध्द शहर पोस्टेला तक्रार दाखल केली आहे.सदर तक्रारीत नमूद आहे की, १७ मार्च रोजी एका वृत्तपत्रातील संपादकीय मथळ्यामध्ये ‘शिवरायांना हे पटेल काय’ असा लेख प्रकाशित झाला असून त्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या व इतर हिंदूवादी संघटनांनी केलेल्या आंदोलना विषयी तसेच त्यांच्या भूमिकेवर भाष्य करणारे लिखाण होते. या लिखाणामुहे सकल हिंदू समाजा सोबत माझ्या सुध्दा धार्मिक भावना दुःखावल्या गेल्याचा आरोप करीत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. फिर्याद देताना अॅड. शेखर जोशी यांच्या सोबत अॅड. चैतन्य जोशी, सचिन पाठक, जान्हवी कुलकर्णी, अमोल जोशी, अनिता देशपांडे, विवेक कुलकर्णी, विजय राजनकर, मोहन कुलकर्णी, विकास आंबेकर, मोहन हसबनीस, रवी जोशी, अमेय बर्डे, दिलीप जोशी, नंदू काळे, मनोज जोशी, राहुल वसाडकर, प्रफुल कुळकर्णी, राम जोशी आदी उपस्थित होते.
Users Today : 168