महिलांच्या सशक्तीकरण व आरोग्यासाठी स्वयंसिद्ध साडीस्पर्धा

Khozmaster
1 Min Read

सिंदखेड राजा:-( तालुका प्रतिनिधी )

महिलांचे आरोग्य फिटनेस आणि आत्मविश्वास वाढवा यासाठी स्वयंसिद्धा महिला मंच सिंदखेडराजा यांनी १५ मार्च रोजी आयोजित साडीस्पर्धा उत्साहात पार पडली.
गेल्या सात वर्षापासून आपली प्राचीन भारतीय संस्कार संस्कृती परंपरा वाढीस लागण्यासाठी साडी नेसून आधुनिक युगातील महिलाही तितक्याच सक्षम व ऊर्जावान आहेत, हे अधोरेखित करण्यासाठी तीन किलोमीटर साडी परिधान करून चालण्याची स्पर्धा यावर्षीही आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण साडी हा केवळ पारंपरिक पोषाख नाही,तर ते स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. आरोग्य आणि फिटनेस दररोज चालण्यासारखा व्यायाम महिलांनी नियमित करावा, विविध क्षेत्रातील महिला एकत्र येऊन त्यांच्यात बंधूभाव निर्माण व्हावा, हा उदांत हेतू समोर ठेवून हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात ७० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. विजेत्या महिलांना प्रथम बक्षीस २५०० रुपये, द्वितीय बक्षीस १५०० रुपये व तृतीय बक्षीस १००० रुपये व प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसिद्ध महिला मंचाच्या सारिका मेहेत्रे, प्रतिभा तायडे, सोनाली खरात, डॉ. मंजुश्री खुरपे, कविता मीनासे, डॉ. रजनी मस्के, शुभांगी मगर, अरुणा चौधरी, सविता गाणार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

0 9 5 2 2 1
Users Today : 169
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *