औद्योगिक क्षेत्रातील विकास समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी कैलास भालेकर यांची निवड

Khozmaster
1 Min Read

चिखली:-( तालुका प्रतिनिधी )

स्व.तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या औद्योगिक क्षेत्रातील विकास समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी कैलास भालेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ५ मार्च रोजी सर्वानुमते पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली.कैलास भालेकर यांच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व तांत्रिक कौशल्याचा महाविद्यालयाच्या विकासासाठी मोठा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन, उद्योग क्षेत्राशी थेट जोडणी, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. कैलास भालेकर यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

0 9 5 2 2 1
Users Today : 169
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *