‘विदर्भ कबड्डी’च्या कार्याध्यक्षपदी गणेश चौकसे बिनविरोध

Khozmaster
1 Min Read

खामगाव:-( तालुका प्रतिनिधी )

येथील गणेश चौकसे यांची कबड्डी असोसिएशनच्या विदर्भ (नागपूर) या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कबड्डी असोसिएशनच्या विदर्भ (नागपूर) ची विशेष सर्वसाधारण आमसभा नुकतीच अकोला येथे पार पडली. या आमसभेत चौकसे यांची एकमताने निवड करण्यात आली. गणेश चौकसे यांच्या नावाचा प्रस्ताव डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशनचे बुलढाणा सचिव गुणेश तायडे यांनी विशेष आमसभेत मांडला व त्याला संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, कबड्डी असोसिएशनचे विदर्भ नागपूरचे सचिव प्रदीप ठाकूर तसेच रेफरी बोर्ड चेयरमन सतिष ईखार यांनी मान्यता देत रीतसर निवड झाल्याचे घोषित केले.

0 9 5 2 3 3
Users Today : 181
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *