दाताळा:-( विशेष प्रतिनिधी )
स्व.शि.भि. पाटील कनिष्ठ महाविद्यालय पोफळी (ता. मोताळा) येथे कार्यरत असलेले प्रा.डी.एन. झनके यांना नुकतेच समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समर्थ फाउंडेशन आणि एज्युरिक हब (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन शैक्षणिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. प्रा.डी.एन.झनके हे नेहमी होतकरू तसेच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक तसेच योग्य मार्गदर्शनपर मदत करीत असतात. त्याचप्रमाणे धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही पुढाकार घेऊन सहभागी होतात व आपल्या परीने होईल तेवढी मदत ते करत असतात. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत लोरिया हॉल (ठाणे) येथे अॅड. प्रकाश हरताळकर (माजी न्यायाधीश मुंबई), कैजर अन्सारी (ज्येष्ठ विधीज्ञ, ठाणे) प्राचार्य दीपक साबळे, प्रा. सुनीताबाई साबळे यांच्या हस्ते त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी या शाळेतील माजी विद्यार्थी अॅड. विशाल अहिरे, अॅड. रविकरण डोंगरे, कैलास सुरडकर, मिलिंद सुरडकर, धनराज तायडे, प्रवीण शेजोळे तसेच अजय इंगळे यांची उपस्थिती होती.
Users Today : 183