राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी

स्थानिक राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या भादोला येथील विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप १२ मार्च रोजी पार पडला.
भादोला (बुलढणा) येथे संस्थाध्यक्ष धृपतराव सावळे, सहसचिव कीर्तिताई पहाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या सात दिवशीय विशेष श्रम संस्कार शिबिरात रोज सकाळी योग व प्राणायाम, प्रार्थना सत्र घेण्यात येवून श्रमदान कार्यक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम, खोदकाम, वृक्षारोपण, शेतकऱ्यांसाठी फवारणीकरिता ड्रोन प्रात्यक्षिक, मतदान जनजागृती, संविधान जनजागृती, व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरण व स्वछता इत्यादी रॅलींचे आयोजन करून व पथनाट्याव्दारे जनजागृती करण्यात आली. तसेच बौद्धिक सत्रामध्ये संविधान जनजागृती, मतदान जनगृती, साहित्य व संस्कृती यांचा सहसंबंध, भावनिक बुद्धिमत्ता व नैराश्य, व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय मार्दर्शन, योग्य औषध उपचार इत्यादी महत्वपूर्ण विषयावर संभाजी पवार, डॉ. आनंद देशपांडे, डॉ. जे. जे. जाधव, डॉ. सुबोध चिंचोले, डॉ. मनीषा राऊत यांचे व्याख्यान पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमांतून सामाजिक संदेश देण्यात आला. दि. १२ मार्च समारोपीय कार्यक्रमाला भादोला सरपंच सुभाष ठेंग, उपसरपंच राजू गवई, मुख्याध्यापिका जाधव उपस्थित होत्या. प्रमुख अतिथींनी शिबिरार्थ्यांना रा. से.यो. चे कार्य असेच सुरु ठेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.एस. काटकर यांनी शिबिरातील सात दिवस राबविलेल्या उपक्रमाची अहवालात्मक माहिती दिली. या प्रसंगी प्रा. अजय पिंपळे, प्रा. वैष्णवी चौधरी, प्रा. रसाळ उपस्थित होते. या शिबिरासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सरपंच, सचिव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती सभापती, सर्व शाळा समिती सदस्य, मराठी पूर्व माध्यमिक शाळा भादोला मुख्यध्यापिका व सर्व शिक्षकानी सहकार्य केले. प्रा. पी.एस. काटकर, प्रा. वैष्णवी चौधरी व योगेश काकडे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

0 9 5 2 3 5
Users Today : 183
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *