संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील टुनकी बुद्रूक येथील प्रकाश जैस्वाल सभागृहात १७ मार्च रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाची कार्यशाळा उत्साहात पार पडली.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ (बुलढाणा) चे समीर देशमुख, एम.ओ. कुंदन सदाशिव, बँक ऑफ महाराष्ट्र (संग्रामपूर) चे शाखा व्यवस्थापक विजय इंगळे, सोनाळा व वानखडे येथील आरोग्य सेवक, कृषी समृद्धी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा गोकुळाबाई बळीराम धाडे, सचिव वनिता माधव धुमाळ, व्यवस्थापक संगीता गणेश दातार यांची उपस्थित होती. प्रास्ताविकातून समीर देशमुख यांनी पुरुष पुरस्कार विषयी मार्गदर्शन केले आणि कुंदन सदाशिव यांनी लिंग समभाव सचित ना या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी समृद्धीच्या संयोगिनी रेखा सुरेश रायपुरे, ज्ञानेश्वरी काळमेघ, रेणुका राहणे यांच्यासह तालुक्यातील २२ गावांतून महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार लेखापाल पूजा प्रीतम पांडे यांनी मानले.
Users Today : 181