संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी
कला व वाणिज्य महाविद्यालय (वरवट बकाल) येथे मराठी विभागातर्फे १५ मार्च रोजी अतिथी व्याख्यान उत्साहात पार पडले.या व्याख्यानाला ‘रोजगाराच्या संधी’ असा विषय ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभागप्रमुख डॉ. सुभाष पवार तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. सिद्धार्थ इंगळे हे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आयोजित व्याख्यानामध्ये रोजगाराच्या संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला मराठी विभागप्रमुख प्रा. आनंद धुंदाळे तसेच ग्रंथपाल सुनील माकोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रमोद खोंड यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. शिवशंकर खंडेराव यांनी केले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.
Users Today : 182