चिखली:-तालुका प्रतिनिधी
खंडाळा मकरध्वज येथील मॉसाहेब मिनाताई ठाकरे विद्यालयात ९ मार्च रोजी २००३ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उबरहंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे इंगळे उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे शिक्षक खेडेकर, गवते, शेटे, गुंजकर, डुकरे, ठेंगसर, भाऊसाहेब, जाधव, आंबासकर, मोरे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.या कार्यक्रमाचे नियोजन मुकुंदा वायाळकर आणि सुनिता देशमुख यांनी केले होते. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद, शाळेचे कर्मचारी आणि २००३ च्या बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले.त्यानंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे दिली. काही विद्यार्थ्यांनीही आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि सर्वजण शाळा दिवसांच्या आठवणीत रमले. आलेले सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. ज्याचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. सुत्रसंचालन मुकुंदा वायाळकर आणि रशीद शहा तर आभार वैशाली तवार यांनी मानले.
Users Today : 182