चिखली:-तालुका प्रतिनिधी
स्थानिक एस.पी.एम.स्व. तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे १८ मार्च रोजी धोडप येथिल बौद्ध विहार परीसरात प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात पालक मेळावा समिती समन्वयक प्रा.डॉ. दिलीप महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बी.ए. भाग एक या वर्गांचा पालक मेळावा उत्साहात पार पडला.
कार्यक्रामचे प्रास्ताविकातून प्रा.डॉ. सतिश मोरे यांनी महाविद्यालय, पालक व विद्यार्थ्यांसोबत महविद्यालयाच्या प्राध्यापकांचे घनिष्ठ संपर्क, संबंध प्रास्थपित होण्याच्या दृष्टीने अश्या प्रकारच्या पालक मेळावाचे आयोजन दरवर्षी विविध गावात व महाविद्यालयात करण्यात येते असे सांगितले. विद्यार्थ्यांचे पालक म्हणून हरिभाऊ वानखेडे, सिध्दार्थ वानखेडे, अशोक वानखेडे, उत्तम गवई, गुलाबराव वानखेडे हे उपस्थित होते. या पालक मेळाव्याच्या उपक्रमांचा उद्देश व भुमिका प्रा.डॉ. सतिश मोरे यांनी स्पष्ट केली. महाविद्यालयातील ग्रंथालय, महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप व सोई सुविधां विषयी, एनसीसी, एनएसएस, एमपीएससी विषयी मार्गदर्शन केले. प्रा.डॉ दिलीप महाजन यांनी मानले. या पालक मेळाव्यास जनाबाई वानखेडे, यशोदा चौतमोल, विमलबाई गवई, समिन्द्राबाई पवार यांनी उपस्थिती दर्शवली. या पालक मेळाव्यास एकुण २६ पालकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Users Today : 182