खरेदी विक्री संस्थेच्या वतीने शासकीय भावात तूर खरेदीस सुरुवात

Khozmaster
1 Min Read

लोणार:-तालुका प्रतिनिधी 

खरेदी विक्री संस्थेच्या वतीने शासकीय भावात शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली असून शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी यांच्या हस्ते तुर विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा रुमाल टोपी देऊन सत्कार करण्यात आला.खुल्या बाजारात तुरीचा भाव शासकीय हमीभावापेक्षा सात-आठशे रुपयांनी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामध्ये त्यांनी केलेला उत्पादन खर्च भरून निघणे अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव मिळावा म्हणून नाफेड अंतर्गत खरेदी विक्री संस्थेच्या वतीने शासकीय हमीभावात तूर खरेदी करण्याचे उद्घाटन आज १९ मार्च रोजी करण्यात आले.
प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बळीराम मापारी, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष हिम्मतराव सानप, संचालक भगवान सानप, उद्धवराव बुधवंत, गणेशराव कुटे, शेतकरी बद्रीनाथ सोनुने, रामेश्वर सोनुने, खरेदी-विक्री संस्थेचे कर्मचारी शिवानंद तारे, सुभाष सांगळे, जगदीश सानप, दिनकर भदर्गे, संजय बुधवत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तुरीची ऑनलाईन नोंदणी चालू असून ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर तुरीची नोंद आहे, त्यांनी सातबारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन खरेदी विक्री संस्थेमध्ये तुरीची नोंदणी करून घ्यावी. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली तूर खुल्या बाजारात विक्री न करता शासनामार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या खरेदी विक्री संस्थेकडे विक्रीसाठी आणावी व शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष हिम्मतराव सानप यांनी केले आहे.

0 9 5 2 6 1
Users Today : 209
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *