डोणगाव:-तालुका प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या गोहोगाव शिवारातील शिवरस्त्याने शेतरस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेमुळे मोकळा श्वास घेतला.मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत डोणगाव परिसरात येणाऱ्या गोहोगाव शिवारात महसुल विभागाच्या वतीने शेतरस्ते मोकळे करण्याची मोहिम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये डोणगाव मंडळातील गोहोगाव शिवारात येणाऱ्या गट नंबर ३८१ ते ३६७ पर्यंत शेत रस्ता सरपंच, पोलीस पाटील, माजी सरपंच, अर्जदार, गैरअर्जदार, मंडळ अधिकारी चनखोरे, ग्राम महसूल अधिकारी अमोल राठोड, अनुप नरोटे, सीमा चव्हाण, महसूल सहायक संदीप परमाळे यांच्या माध्यमातून समोपचाराने मोकळा करण्यात आला.तर आरेगाव ते लेहणी शिवरस्ता मंडळ अधिकारी चनखोरे, तलाठी भूषण खिल्लारे, अनुप नरोटे, अमोल राठोड महसूल सहायक संदीप परमाळे, पुंडलिक राक्षे, पंच, अर्जदार गैरअर्जदार यांच्या समक्ष खुला करण्यात आला. त्यामुळे डोणगाव मंडळातील दोन शेतरस्त्यांनी १८ मार्च रोजी मोकळा श्वास घेतला.
Users Today : 209