मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील नरवेल येथील आरोग्य उपकेंद्रात सुरक्षा गार्ड, आरोग्य सेविका (एनएम), ओपीडीएनएम देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत व शहर प्रमुख गजानन ठोसर यांनी केली आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा जैन यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, नरवेल येथील आरोग्य केंद्रात टवाळखोर मुलांचा व दारुड्यांचा महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या ठिकाणी उपचाासाठी येणाऱ्या महिला असुरक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ सुरक्षा गार्डची नियुक्ती करण्यात येवून आरोग्य सेविका देण्यात यावी, आरोग्य उपकेंद्राची जुनी इमारत मोकळी झाली असून त्यामध्ये दारुडे यांचा उपद्रव्य सुरु असल्याने सदर इमारत जमीनदोस्त करण्यात यावी, अशी मागणी देखील राजेशसिंह राजपूत व गजानन ठोसर यांनी केली आहे.
Users Today : 209