सामाजिक दातृत्व अंतर्गत कार्यक्रमाला प्रतिसाद

Khozmaster
1 Min Read

पाडळी शिंदे:-विशेष प्रतिनिधी

नागरिकांच्या सुकर जीवनमानासाठी शासनाने हमी दिल्या प्रमाणे शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत पाडळी शिंदे व सावखेड नागरे येथे १९ मार्च रोजी सामाजिक दातृत्व कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार डॉ. संतोष मुंढे तर प्रमुख उपस्थितीत मंडळाधिकारी प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी मदन जारवाल, राजू ठेंग, संजय मोरे, अरुण जाधव, पोलीस पाटील भारत शिंदे, कैलास नागरे, पत्रकार स्वप्नील शिंदे, उपस्थित होते. यावेळी त्यांनी शासनाच्या वतीने सामाजिक दातृत्व या योजनेअंतर्गत आधारला मोबाईल लिंक असणे, जीवंत सातबारा, फार्मर आयडी, निराधार योजनेची माहिती विविध प्रकारचे कागदपत्रे यासह इतरही योजनांची माहिती दिली. तसेच विविध प्रकारचे कागदपत्रे लाभार्थ्यांना वाटप केले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी मदन जारवाल, भारत शिंदे, स्वप्नील शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम महसूल अधिकारी मदन जारवाल व पाडळी शिंदे ग्रामपंचायतचे संदिप शिंदे, ज्ञानेश्वर पडुळकर, सावखेड नागरे ग्रामपंचायतचे विश्वनाथ पांगरकर, महसुल सहायक भगवान ढोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पाडळी शिंदे, सावखेड नागरे गावातील जेष्ठ तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. सावखेड नागरे येथील अनाथ मुलगी ऋतुजा भगवान म्हस्के हीची योजनेची फाईल करून देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी मदन जारवाल यांनी जबाबदारी घेतली.

0 9 5 2 6 1
Users Today : 209
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *