ग्राहकांनी सजग असायला हवे : वैशाली गावंडे

Khozmaster
2 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

ग्राहकांच्या संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदे, ग्राहक तक्रार निवारण समिती, ग्राहक मंच सारखे दालने आहेतच. मात्र ग्राहकांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेऊन उत्पादक, विक्रेते, व्यापारी वर्ग सोबतच ग्राहकांनी सजग असायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष वैशालीताई गावंडे यांनी जागतिक ग्राहकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.ग्राहक संरक्षण अधिनियमच्या तरतुदींची ग्राहकांना जाणीव करून देणे तसेच ग्राहक चळवळीला चालना देणे याकरिता जागतिक ग्राहकदिनानिमित्त १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय (मलकापूर) येथे ग्राहकदिन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार चारुशीला चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती वैशालीताई गावंडे ह्या होत्या. प्रमुख उपस्थितीत दामोदर लखानी, नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले, उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी, पुरवठा निरीक्षक अधिकारी धनश्रीताई हरणे, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष नगीनदास बैरागी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर गणेश कदम व त्यांचा चमूने ग्राहक चळवळी संदर्भात लोकगीते व लोकनाट्य सादर करीत केली. तर याप्रसंगी संगीत शिक्षक अशोक जंजाळकर, तबला वादक दिव्या शंखपाळ, डॉ. मनीषा खचें, विद्या पाटील यांनी ग्राहक गीत सादर केले. दामोदर लखानी यांनी ग्राहक हा बाजारपेठे मधील महत्त्वाचा धागा असून ग्राहकांनी तथा शेतकऱ्यांनी खरेदी करीत असताना घ्यावयाची काळजी व आवश्यक असणाऱ्या बाबी संदर्भात माहिती सांगितली. नायब तहसीलदार चारुशीला चौधरी यांनी ग्राहकांचे न्याय संदर्भात मूलभूत अधिकार सांगितले. सुत्रसंचालन जिल्हा सचिव श्रीकांत अंधारे तर आभार तालुका सचिव दिलीप पाटील यांनी मानले. या प्रसंगी डॉ. कमलताई काबरा, दामोदर शर्मा, विजय डागा, कमल शर्मा, चंदनसिंह राजपूत, रवींद्र जोशी, ईश्वर दिक्षितधर्मेश राजपूत, कैलास गणगे, प्रवीण पाटील, विजय कुलकर्णी, राहुल खेडकर, भल्ला, बंसीदास वैष्णव, शकील, पंकज मोरे, बबलू जाधव, ग्राहक पंचायत, तहसील कार्यालय, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 5 2 6 1
Users Today : 209
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *