लक्ष्मी मुक्ती योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा : भूषण पाटील

Khozmaster
1 Min Read

लोणार:-तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने सण १९९२ मध्ये काही सामाजिक संघटनांनी सुचविल्या नुसार स्त्रियांचे हक्क सुरक्षित रहावे, या साठी लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केलेली आहे. या योजने नुसार महिलांना त्यांच्या पतीच्या नावाने असलेल्या जमिनीमध्ये पतीच्या संमतीवरून सह हिसेदार होता येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार भुषण पाटील यांनी केले आहे.लक्ष्मी मुक्ती योजनेचा नागरिकांना विसर पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त प्रचार करून मोहीम स्वरूपात ही योजना लोणार तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी रहिवाशी दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, शेतीच्या सात-बारासह अर्ज, लाभार्थी कायदेशीर पत्नी असल्याच्या पोलीस पाटील यांचा दाखला, स्टॅमपेपरवर पतीचे संमतीपत्र ही कागदपत्रे संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावी लागणार आहे. तलाठी त्यावरून शासनाच्या परिपत्रकानुसार याची नोंद घेणार आहेत. या योजनेचा ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार भूषण पाटील यांनी केले आहे. यावेळी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, मंडळ अधिकारी विजय पोफळे उपस्थित होते.

0 9 5 2 7 1
Users Today : 219
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *