तळणी येथील जगदंबा मातेचा रविवारी यात्रा महोत्सव हजारो भाविकांची राहणार उपस्थिती

Khozmaster
1 Min Read

मोताळा:-तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील तळणी येथे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जगदंबा माता यात्रामहोत्सव सोहळ्याचे आयोजन २३ मार्च रोजी करण्यात आले आहे. येथे हजोरो भाविक हजेरी लावतात. गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रा महोत्सवाला शेकडो वर्षांची जुनी परंपरा आहे. सासरी गेलेल्या लेकीबाळी हजेरी लावतात असल्याने गावाला दिवाळीसारखे स्वरुप प्राप्त होते.
तळणी येथे होळीनंतर फाल्गुन कृ. नवमीला जगदंबा माता यात्रेचे आयोजन करण्यात येते. जुन्या काळात नाफडे (पाटील) घराण्यातील दिवाणखान्यात जगदंबा मातेची मुर्ती सापडल्याचे सांगितल्या जाते. मुर्ती सापडलेल्या नंतर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन गावात भव्य असे जगदंबा मातेचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराची जागृत देवस्थान म्हणून आजुबाजूच्या परिसरात ख्याती आहे. जगदंबा मातेच्या मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करुन आंब्याच्या पानांची तोरणे बांधून पुष्पाद्वारे सजावट करण्यात आली. येथे दरवर्षी यात्रा महोत्सव गावकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. जुन्या काळापासून सुरु असलेली परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे. यात्रेच्या आदल्या दिवशी पाच जोडप्यांच्या हस्ते होमहवन करुन पूजा करण्यात येते. यात्रेच्या दिवशी सकाळपासून शिस्तबद्ध पद्धतीने लाखो भाविकभक्त हजेरी लावत दर्शन घेतात. सकाळी ११ वाजता देवीची पूजा करुन गावातून मिरवणूक काढली जाते. दुपारी देवीला सर्वप्रथम उडदाची डाळ भाकरीचा नैवद्य दाखवून गावकऱ्यांच्यावतीने महाप्रसादाला (भंडारा) सुरुवात केली जाते. यावर्षीसुध्दा ८५ पायल्या उडदाची दाळाची महाप्रसाद करण्यात येणार आहे. महाप्रसादाचा जवळपास ५ ते ६ हजार भाविक लाभ घेतात

0 9 5 2 7 1
Users Today : 219
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *