बियाणी यांच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या वाल कंपाऊंडनजीक आग

Khozmaster
1 Min Read

मूर्तीजापूर:-विशेष प्रतिनिधी

येथील मेन रोड श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालया जवळ अरूण मनोहरलाल बियाणी यांची जुनी जिनींग प्रेसींग फॅक्टरी आहे. सध्या स्थितीत ते बंद असुन जिनींगच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात आडजाती प्रजातीच्या वृक्षांनी वालकंम्पाउड दिसेनासे झाले आहे. दि.१९ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजताचे अज्ञाताने तेथे काडी कचरा पेटविल्या ने आग लागली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही. पण बेरोजगार युवक त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी लहान लहान दुकाने आपली उपजीविका भागविण्यासाठी लावली आहे. पण त्या दुकानांना काही इजा पोहचली नाही. पण संपूर्ण झाडे आगीमध्ये जळाली आहे. वेळीच मुर्तिजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये राजु जवंजाळ, आसीफ शेख, सलीम खान यांनी मोलाची कामगिरी बजावली. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

0 9 5 2 7 1
Users Today : 219
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *