पिंपळगाव सराई:- विशेष प्रतिनिधी
सैलानी बाबांच्या संदल सोहळ्यानिमित्त पिंपळगाव सराई आणि सैलानी यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता पिंपळगाव सराई येथील बाजार गल्लीत भाविकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा संदल निघणार असल्याने संदलचे दर्शन व्हावे, यासाठी भाविकांनी आधीच बाजार गल्लीत जागा निश्चित केल्या आहेत.संदल सोहळ्याच्या निमित्ताने सुगंधी द्रव्ये, चंदनाचा लेप आणि फुलांची चादर आकर्षक पद्धतीने सजवून उंटाच्या पाठीवर ठेवण्यात आला होता. हे साहित्य पिंपळगाव सराईतील संदल घरातून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सैलानी बाबांच्या दर्ज्याकडे नेण्यात येते. तेथे सैलानी बाबांच्या दर्यावर चादर चढविण्यात येते.संदल सोहळा पहाण्यासाठी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यासाठी दाखल झाले. रात्री उशिरा शेख रफिक मुजावर, शफिक मुजावर, चाँद मुजावर आणि जाहीर मुजावर यांच्या उपस्थितीत संदल यात्रेला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजराने परिसर होता. भक्तिमय संपूर्ण झाला.
Users Today : 219