ग्रंथदिंडी, वाचन संस्कृतीसह मराठीचा जागर! ग्रंथोत्सवाचा समारोप : वाचनप्रेमींची ग्रंथ खरेदी

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे गर्दै वाचनालयाच्या सभागृहात दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलनासह परिसंवादात वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला. ग्रंथप्रदर्शनातून वाचक तसेच ग्रंथालय चालकांनी पुस्तक खरेदीही केली. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन साहित्यिका अर्चना देव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, बाबासाहेब वरणगावकर, उदय देशपांडे, किं. वा. वाघ, डॉ. राजेंद्र गणगे, नेमिनाथ सातपुते, विष्णू इंगळे, ग्रंथालयांचे पदाधिकारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी शहरातील हुतात्मा स्मारकापासून गर्दै वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. अभिजात मराठी आपली जबाबदारी!महोत्सवात ‘अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी’ या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. एस. एम. कानडजे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. परिसंवादात डॉ. किं. वा. वाघ, सुनील वायाळ, नेमिनाथ सातपुते यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रा. निशिकांत ढवळे यांनी केले, तर गजानन कुरवाडे यांनी आभार मानले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर रंगला परिसंवाद ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता “कृत्रिम बुद्धिमत्ता वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम” या विषयावर प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. प्रमुख वक्ते डॉ. अरुण नन्हई, महेंद्र बोर्डे यांनी सहभाग घेतला. दुपारी १:३० वाजता “वाचन चळवळीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान” या विषयावर डॉ. अनंत सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. डॉ. राजेंद्र गणगे, देविदास समुद्रवार, सुनील झोरे, अनंत सातव, रामेश्वर गायकी, विष्णू इंगळे सहभागी झाले होते. दुपारी डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगले. यामध्ये नितीन वरणकार, अरविंद शिंगाडे, राम सोनोने, सर्जेराव चव्हाण, कडुबा बनसोडे, धनंजय मन्हे यांनी कविता सादर केल्याग्रंथदिंडी उत्साहात ग्रंथदिंडीत महिला, शाळकरी विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कीर्तन, पारंपरिक फुगडीचे सादरीकरण करण्यात आले. ग्रंथोत्सवात वाचन संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी ग्रंथप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले.

0 9 5 2 7 1
Users Today : 219
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *