खोलखेडच्या शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

Khozmaster
1 Min Read

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी 

खोलखेड येथील शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ मार्चच्या दुपारी निमगाव येथे घडली.खोलखेड (ता. खामगाव) येथील रहिवासी असलेला कृष्णा सुनिल जमेवार (वय १३ वर्षे) यांने १८ मार्चच्या दुपारी नारखेड शिवारात असलेल्या आपल्या शेतातील झोपडीत लाकडी ठुनीला बाजीच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नारखेड येथे धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी हरीदास श्रीराम जमेवार (रा. खोलखेड) यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन इंगळे हे करीत आहेत.

0 9 5 2 8 7
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *