चिखली:-तालुका प्रतिनिधी
मुंबईमध्ये विधानसभा अधिवेशन काळातच अतिशय व्यस्त वेळापत्रक असतानाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व आमदार श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची बैठक झाली. बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेली कामे आणि त्यामुळे जनतेला सोसावे लागणारे हाल महाले यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. जलजीवन मिशनचे कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम पूर्ण करावे; अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. आमदार महाले यांच्या मागणीनुसार व पुढाकाराने ही बैठक बोलाविण्यात आली. जल जीवन मिशन व जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीला प्रधान सचिव (स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग), सदस्य सचिव (मजीप्रा), अभियान संचालक मिशन), (जलजीवन अभियान संचालक (स्वच्छ भारत मिशन), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती मजीप्राचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता मजीप्रा अकोला, राहुल जाधव (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा बुलढाणा), अनिल चव्हाण (उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, चिखली), नितीन परळकर, (उपअभियंता, ग्रामीणपाणीपुरवठा योजना, बुलढाणा), राजेंद्र वाघमारे,(शाखा अभियंता), कृष्णा आव्हाड, (कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा), वरिष्ठ भू वैज्ञानिक बुलढाणा यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीमध्ये काम व गावनिहाय सर्व पाणीपुरवठा योजनांचा आढावा गुलाबराव पाटील व आमदार श्वेताताई महाले यांनी घेतला.ना. पाटील यांनी कामांच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व कामे तातडीने, गतीने व गुणवत्तापूर्ण करण्यास सुचित केले.
Users Today : 13